आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून…
आषाढी एकादशी वरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आजपासून आषाढी यात्रेचा संपूर्ण कालावधी संपेपर्यंत VIP दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर समितीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. वारकरी, दिंड्या आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे सर्व भाविकांना समान संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मंदिर समितीच्या निर्णयामुळे सर्व भाविकांना नियमित रांगेतूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. यामुळे दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे. दरम्यान, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून विविध सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.