मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!

मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!

| Updated on: Aug 24, 2026 | 11:14 AM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. मोदींनी गुजरातमध्ये चहा विकल्याचा पुरावा मिळाल्यास राजकारण सोडण्याचे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मोदींच्या बालपणीच्या चहा विक्रीच्या दाव्यावर भाष्य केले. “मोदी खरोखरच चहा विकत असल्याचा मला कुणी पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन,” असे ते म्हणाले. मोदी ज्या काळात गुजरातमध्ये चहा विकत असल्याचे सांगितले जाते, त्या काळात संबंधित रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म अस्तित्वात नसल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यामुळे “मग मोदींनी चहा कुठे विकला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सामान्य कुटुंबातून आलो असून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्याचे सांगितले होते. तसेच मोदी चहा विकत होते आणि ते पंतप्रधान झाले, असे म्हटले होते. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती.

यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. “देवेंद्र फडणवीस परत खोटे बोलत आहेत. मोदींनी लहानपणी चहा विकला नाही,” असे ते म्हणाले. तसेच पुरावा दिल्यास राजकारण सोडण्याचे आव्हान त्यांनी पुन्हा दिले.

Published on: Aug 24, 2026 11:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us