Sanjay Raut | राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत यांचे विधान; महाविकास आघाडीची एकच जागा निश्चित?

Sanjay Raut | राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत यांचे विधान; महाविकास आघाडीची एकच जागा निश्चित?

| Updated on: Feb 20, 2026 | 12:47 PM

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा रंगत असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची केवळ एकच जागा जाईल आणि तेवढे संख्याबळ सध्या आमच्याकडे आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा रंगत असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची केवळ एकच जागा जाईल आणि तेवढे संख्याबळ सध्या आमच्याकडे आहे. निर्णय प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि अस्मितेसाठी काम करणारे नेतृत्व कोणते?, यावर तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. हा निर्णय एकमतानेच होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचेही काही सदस्य निवृत्त झाले असून शिवसेनेचाही एक सदस्य निवृत्त झाला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्रित चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, या संदर्भात माध्यमांकडून विचारले जाणारे काही प्रश्न निरर्थक असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे.

Published on: Feb 20, 2026 12:47 PM