Sanjay Raut : ‘.. तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे’; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut : ‘.. तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे’; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले

| Updated on: Apr 20, 2025 | 11:42 AM

महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या चर्चेवर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केल.

राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो होता महाराष्ट्राच्या हिताचा. त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील काही क्षणात प्रतिसाद दिल, तो देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता. यात अटी शर्ती कुठे आल्या? अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या चर्चेवर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केल. दोन भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर सहमती होते आहे, तर त्यावर फार वादविवाद करणं योग्य नाही, असंही राऊत यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी सांगितलं की, महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही. त्यांच्याबरोबर असलेले लोक यात बसत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहे.  मराठी माणसांचा स्वाभिमान, ज्या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. ते ध्येय काय होतं. महाराष्ट्र आणि मराठी माणूस, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती. आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून जर या संदर्भात काम करणारी लोकं एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

Published on: Apr 20, 2025 11:41 AM
Follow Us