Sanjay Raut On Ritu Tawade: मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut On Ritu Tawade: मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! संजय राऊतांचं मोठं विधान

| Updated on: Feb 08, 2026 | 11:20 AM

संजय राऊत यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर ऋतुजा तावडे यांच्या काँग्रेसच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले. मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर निवडल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, सलमान खानच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुस्लिमांना संघात प्रवेशाबाबत मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर ऋतुजा तावडे यांच्या निवडीवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सलमान खानच्या उपस्थितीवर भाष्य केले. राऊत यांनी ऋतुजा तावडे यांचे अभिनंदन करत त्या मूळच्या काँग्रेसच्या असल्याचे म्हटले. शिवसेनेने मराठी माणूस आणि अस्मितेवर भर दिल्यानेच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर निवडावी लागली असा दावा त्यांनी केला. या निमित्ताने भाजपला मुंबईतील मराठी माणूस हिंदू असल्याची जाणीव झाल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सलमान खानच्या उपस्थितीवर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सलमान खानची उपस्थिती गर्दी जमवण्यासाठी होती की संघात मुस्लिमांनाही खुले आमंत्रण आहे हे दर्शवण्यासाठी होती अशी विचारणा त्यांनी केली. मोहन भागवत यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत, सध्याच्या द्वेषपूर्ण राजकारणात संघाचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला.

Published on: Feb 08, 2026 11:20 AM