प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
संजय राऊत यांनी मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. या क्लिपमध्ये प्रदीप पूर्णेकरांच्या घरात गुंड घुसवून त्यांना संपवण्याची धमकी दिल्याचे राऊतांचे म्हणणे आहे. राऊतांनी मीनाक्षी शिंदे यांना लेडी डॉन संबोधले आहे, तर पूर्णेकरांच्या मुलाने एफआयआरची मागणी केली आहे. टीव्ही ९ मराठी या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या क्लिपमध्ये प्रदीप पूर्णेकरांच्या घरात गुंड घुसवून त्यांना संपवण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. राऊत यांनी मीनाक्षी शिंदे यांचा लेडी डॉन असा उल्लेख करत, ठाण्यातील या कथित लेडी डॉनला कोण वाचवत आहे, असा सवालही उपस्थित केला आहे. टीव्ही ९ मराठी या कथित ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची किंवा त्यातील व्यक्तींच्या ओळखीची पुष्टी करत नाही. मात्र, या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.
घटनेनंतर प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाने थेट मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचे नाव एफआयआरमध्ये दाखल करण्याची मागणी केली आहे. पूर्णेकरांच्या मुलाच्या या मागणीनंतर संजय राऊत अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
