Sanjay Raut | मला अटक झाली तेव्हाही… आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी सांगितलं 2022 मधील प्रकरण

Sanjay Raut | मला अटक झाली तेव्हाही… आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी सांगितलं 2022 मधील प्रकरण

| Updated on: Apr 25, 2026 | 11:28 AM

नुकतीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. आप पक्षातील राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावरून त्यांनी भाजपवर खणखणीत टोलेबाजी केली आहे. इतकेच नाही तर त्यांना अटक झाली त्या वेळेसचं प्रकरणही सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी हे देशात डंपिंग ग्राऊंडचे राजकारण करत आहे. भाजप निर्लज्ज झाली आहे. तिने लाज सोडली आहे. राघव चड्ढासारखे काही लोक माझे मित्र होते. कालपर्यंत राघव चड्ढा हे भाजपला गुंडांचा पक्ष म्हणत होते. भाजप हा गुंड आणि भ्रष्ट लोकांचा पक्ष आहे. आज ते होलसेलमध्ये गुंडांच्या पक्षात गेले आहेत.’

पुढे संजय राऊतांनी त्यांच्या २०२२ मधील अटकेची घटना सांगितली, जेव्हा त्यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यावर दबाव होता, जोर दिला जात होता की पक्ष सोडा, मात्र त्यांनी तुरुंगात जाणं मान्य केलं, पण पक्ष सोडला नाही.

Published on: Apr 25, 2026 11:28 AM
Follow Us