VIDEO : Sanjay Raut | मंत्रालयात मिळालेल्या ‘त्या’ बाटल्या भाजपने लॅबमध्ये पाठवाव्यात : संजय राऊत

VIDEO : Sanjay Raut | मंत्रालयात मिळालेल्या ‘त्या’ बाटल्या भाजपने लॅबमध्ये पाठवाव्यात : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 1:23 PM

वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा. आम्हाला कोणता वास काय कळत नाही. आता कोण वास घ्यायला गेलंय बाटल्यांचा हे पाहावं लागेल. पण मला कोण्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. या मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे, असे राऊत म्हणाले.