तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्… संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेलं एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यांनी एका मोठ्या घोटाळ्याचं प्रकरण प्रकाश झोतात आणला आणि विरोधकांवर सडकून टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी 'ऑपरेशन टायगर' या मुद्यावरदेखील सविस्तर मत मांडलं.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेलं एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यांनी एका मोठ्या घोटाळ्याचं प्रकरण प्रकाश झोतात आणला आणि विरोधकांवर सडकून टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ या मुद्यावरदेखील सविस्तर मत मांडलं.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘ऑपरेशन टायगर करणार म्हणातात, त्यांचंच ऑपरेशन मोदी-शहांनी केलं आहे. ते काय करून घेणार? महत्त्वाचं म्हणजे आमचे आमदार, आमचे खासदार कुठे चाललेत की नाही, सोबत ते आम्ही बघू; भाजपने आधी त्यांचे नेते काय करतात ते बघावं. कोण आहे तो राजेश मेहता? त्याने १५ लाख कोटींचा घोटाळा केला, त्यावर बोला. तो घोटाळा करणारा भाजपचाच आहे ना? त्याच्या राजेश ज्वेलर्समध्ये हेच नेते मिरवत होते, इतकेच नाही तर याचे फोटो प्रसिद्ध झालेत. पक्ष फोडण्यासाठी पैसा कुठून येतो? हे याचं उत्तर आहे.’
संजय राऊतांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
