‘मी व्हिडीओच शेअर करणार…’ 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

‘मी व्हिडीओच शेअर करणार…’ 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 09, 2026 | 11:45 AM

'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील ती घटना सांगत संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘मी व्हिडीओच शेअर करणार…’ 2020 मधील ती घटना सांगत संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत, भाजप भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देत असल्याची टीका केली.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, सुवेंदू अधिकारी हे भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये आहेत.’ ‘2020 च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्यांच्यामध्ये सुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या. या धाडी टाकायला सुरूवात झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले. आणि आज ते मुख्यमंत्री बनत आहेत, असं संजय राऊत यांनी नमूद केलं. पुढे संजय राऊत म्हणाले मी ‘याचा व्हिडीओदेखील शेअर करणार आहे.’

Published on: May 09, 2026 11:45 AM
Follow Us