Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 13, 2026 | 10:09 AM

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून बॉटल फेकून हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप करत त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर रात्री उशिरा तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी शिरसाट यांच्या घरावर बॉटल फेकून मारल्याची घटना घडली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना, हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी बंगल्याच्या सुरक्षा रक्षकासोबत हुज्जत घातल्याचाही आरोप केला. या प्रकरणावरून शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांवर तीव्र संताप व्यक्त केला. “महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक फोन उचलतात, पण पोलीस आयुक्तांचा फोन बंद आहे,” असा आरोप करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवरून पोलीस आयुक्त गंभीर नसल्याचे म्हटले. त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी शिरसाट यांनी केली असून, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचेही शिरसाट यांनी नमूद केले.

Published on: Nov 13, 2026 10:09 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us