Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू

Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू

| Updated on: Jul 24, 2026 | 12:45 PM

सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ भीषण रस्ता अपघात झाला असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ भीषण रस्ता अपघात झाला असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाठार निंबाळकर हद्दीत भरधाव वेगाने जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाल्याच्या कठड्याला जोरदार धडकली. धडकेनंतर कार उलटल्याने हा भीषण अपघात घडला.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 24, 2026 12:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us