आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह ‘मातोश्री’ला जाणार

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह ‘मातोश्री’ला जाणार

| Updated on: Sep 19, 2026 | 10:39 AM

दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान आज वकिलांसोबत आदित्य ठाकरेंना मातोश्रीवर ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस देण्यासाठी जाणार आहेत. आदित्य ठाकरेंनी केलेल्या सोशल मीडिया पोस्ट विरोधात ही कारवाई केली जात आहे. कायदेशीर कारवाई करताना अडचण येऊ नये म्हणून सतीश सालियान यांनी पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे.

दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान आज त्यांच्या वकिलांसोबत मातोश्रीवर जाणार आहेत. ते आदित्य ठाकरेंना ५०० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस देणार आहेत. आदित्य ठाकरेंनी केलेल्या सोशल मीडिया पोस्ट विरोधात ही नोटीस दिली जाणार असल्याची माहिती सतीश सालियान यांच्या वकिलांनी दिली आहे. सीबीआयने दिशा सालियान प्रकरणात सतीश सालियान यांचा जबाब नोंदवल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर दोन पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले होते.

मात्र, या पोस्टमुळे आपली बदनामी झाल्याचा दावा सतीश सालियान यांनी केला आहे. यामुळे वैयक्तिक वैर आणि राजकीय हेतूने टीका केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुपारी चार वाजता सतीश सालियान आणि त्यांची कायदेशीर टीम मातोश्रीवर पोहोचणार आहे. नोटीस देताना अडचण येऊ नये यासाठी सतीश सालियान यांनी पोलीस संरक्षणाची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखले जाते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Sep 19, 2026 10:21 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us