Kolhapur Jayanti River Pollution News | जयंती नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्न ऐरणीवर
एकेकाळी कोल्हापूर शहराच्या वैभवाचे प्रतीक मानली जाणारी जयंती नदी आज पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून तिचे स्वरूप अक्षरशः नाल्यासारखे झाले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, घरगुती साहित्य, मेडिकल वेस्ट यामुळे नदीचे पाणी पूर्णतः दूषित झाले आहे.
एकेकाळी कोल्हापूर शहराच्या वैभवाचे प्रतीक मानली जाणारी जयंती नदी आज पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून तिचे स्वरूप अक्षरशः नाल्यासारखे झाले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, घरगुती साहित्य, मेडिकल वेस्ट यामुळे नदीचे पाणी पूर्णतः दूषित झाले आहे. जयंती नदीसोबतच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. नदीपात्रात टाकण्यात येणारा घनकचरा आणि सांडपाणी यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठ दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून नदीपात्रातील कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दररोज दोन ते तीन ट्रॅक्टर भरून कचरा बाहेर काढला जात असला तरीही सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज आहे.
