राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत….
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा आणि संभाव्य विलिनीकरणावर सविस्तर चर्चा होणार आहे.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, परंतु काही कारणांमुळे त्या रखडल्या होत्या. आता या बैठकीच्या निमित्ताने पक्षाची विलिनीकरणाबाबतची नेमकी भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बैठकीला शरद पवार स्वतः आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि पक्षाची ध्येयधोरणे याबाबतही या बैठकीत विचारमंथन केले जाईल. या बैठकीनंतर शरद पवार पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.