मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण

मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण

| Updated on: Jul 28, 2026 | 4:11 PM

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामती दौऱ्यासाठी आमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीतील विद्याप्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी हे निमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानांना बारामतीत येण्याचं निमंत्रण दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विद्याप्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत किंवा कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिलेल्या या निमंत्रणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असून, आगामी काळात या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 28, 2026 4:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us