NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या

NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या

| Updated on: Jul 18, 2026 | 1:10 PM

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी प्रथम एकत्र यावे, त्यानंतरच एनडीएमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गटांचे विलिनीकरण झाल्यास केंद्र सरकारमध्ये प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

यापूर्वीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर या चर्चांचा वेग कमी झाला. आता पुन्हा एनडीए प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, 14 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रावादी नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. या भेटींमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र या सर्व चर्चांवर संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 18, 2026 1:10 PM
Follow Us