ShivSena | मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र एका अटीवर…

ShivSena | मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र एका अटीवर…

| Updated on: Apr 27, 2026 | 11:48 AM

विधानपरिषदेवर कोणत्या पक्षातून कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी काही नावे समोर आली आहेत.

विधानपरिषदेवर कोणत्या पक्षातून कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी काही नावे समोर आली आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, यापैकी एक नाव बच्चू कडू आहे, तर दुसरं नाव नीलम गोऱ्हे यांचे आहे. अलीकडेच याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य नावाला अनेकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांचे विधानपरिषदेद्वारे राजकीय पुनर्वसन होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा अशी अट असेल असं सांगितलं जात आहे. बच्चू कडू यांनी अद्याप कोणतीच भूमिका मांडली नसली, तरी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता पक्षप्रमुख कोणता निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Apr 27, 2026 11:29 AM
Follow Us