शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 

शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 

| Updated on: Jun 26, 2026 | 1:37 PM

शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी खासदार संजय दीला पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हा विषय आता इथेच थांबवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. “संजय पाटील यांची वागण्याची पद्धतच तशी आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता ते पुन्हा असे वक्तव्य करणार नाहीत,” असे उदय सामंत म्हणाले.

मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी खासदार संजय दीला पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हा विषय आता इथेच थांबवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. “संजय पाटील यांची वागण्याची पद्धतच तशी आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता ते पुन्हा असे वक्तव्य करणार नाहीत,” असे उदय सामंत म्हणाले. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचेही त्यांनी मान्य केले. “संजय पाटील सारखा जिवाला जीव देणारा मित्र मिळणे कठीण आहे. त्यांच्या वतीने मीही दिलगिरी व्यक्त करतो, महत्त्वाचं म्हणजे बंडखोरीनंतर अनेक वेळा शिवगाळ सहन केली त्यामुळे राग निघाला असेल” असे सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पक्षप्रवेशाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, “रोजच पक्षप्रवेश सुरू आहेत. एखाद्या आमदाराची इच्छा असेल तर आम्ही त्यांना का नाकारावे?” त्यांनी विरोधकांच्या ‘ऑपरेशन’च्या चर्चेलाही उत्तर दिले. “365 दिवस रोज ऑपरेशन सुरू असेल तर त्याला अर्थ उरत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच कॉंग्रेसचे वडेट्टीवार आमच्या पक्षात आले तर आम्ही नाही म्हणणार का? उलट अनेक वर्षंचा राजकीय अनुभव असलेला नेता मिळेल,’ असेही ते म्हणाले.

Published on: Jun 26, 2026 1:37 PM
Follow Us