Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

| Updated on: Jul 30, 2026 | 10:30 AM

शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हासंदर्भातील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती बी. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून, अंतिम युक्तिवादाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादाशी संबंधित हे प्रकरण गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आजच्या सुनावणीत पुढील सुनावणीचे वेळापत्रक, अंतिम युक्तिवादाची प्रक्रिया आणि प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात न्यायालयाकडून महत्त्वाचे आदेश दिले जाऊ शकतात.

या प्रकरणाकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादाच्या पुढील प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 30, 2026 10:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us