Vasant More : वसंत मोरेंची थेट बांबू दाखवत भाजप खासदाराला धमकी अन् दुबेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

Vasant More : वसंत मोरेंची थेट बांबू दाखवत भाजप खासदाराला धमकी अन् दुबेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

| Updated on: Jul 07, 2025 | 3:36 PM

'हे सगळं भाजप करत आहेत. मराठी आणि हिंदी वाद हा भाजप लावत आहेत, यामागे भाजप आहे. मात्र आम्ही त्याला उत्तर देवू. हातातला हा बांबू आहे. मी अनेकदा हातोडा पण वापरला आहे. त्यामुळे आम्ही कृतीतून उत्तर देवू. निशिकांत दुबे याने तिकडे बसून असे वक्तव्य करू नये'

ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या ट्विटवर टीका करत जोरदार हल्लाबोल केलाय. वसंत मोरे यांनी निशिकांत दुबे यांना थेट धमकी दिल्याचे पाहायला मिळत आहे. वसंत मोरे यांनी निशिकांत दुबे यांना धमकी देताना निशिकांत दुबे यांना थेट बांबूच दाखवला आहे.

‘कोणतरी सुशील केडियासारखा कोणतरी बडबड करतो आणि हा निशिकांत दुबे आला. निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलंय ते त्यांनी त्यांच्या मतदारसंघात बसून केलंय. ते जर आपटा-आपटीची भाषा करत असाल तर त्यासाठी अंगात रग लागते आणि ती महाराष्ट्राच्या लाल मातीत आहे. आमच्याकडे पण अशा वाचारवीरांसाठी बांबू, हतोडा असतात. याचा वापर आम्हाला करावा लागला तर याला कारणीभूत दुबे सारखेच प्रतिनिधी असतील’, असं म्हणत वसंत मोरे यांनी निशिकांत दुबेंना धमकी दिली.

Published on: Jul 07, 2025 03:36 PM