मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या जीवावर... नागपुरातील वाठोडा परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घरावर मध्यरात्री अचानक गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी मोडघरे यांच्या घरावर गोळीबार केला. ही घटना रात्री साडेबारा वाजतानंतर घडली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, शुभम मोडघरे आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला.
नागपुरातील वाठोडा परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घरावर मध्यरात्री अचानक गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी मोडघरे यांच्या घरावर गोळीबार केला. ही घटना रात्री साडेबारा वाजतानंतर घडली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, शुभम मोडघरे आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला. घटनेची माहिती मिळताच शुभम मोडघरे यांनी तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधला. तसेच, त्यांनी आमदार विकास ठाकरे यांनाही घटनेची माहिती दिली.
आमदार ठाकरे मुंबईवरून आल्यानंतर थेट मोडघरे यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फुटेजमध्ये दोन व्यक्ती तोंडाला स्कार्फ बांधून वेगाने पळून जात असल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
