Anna Hazare : अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा राष्ट्रहिताचा असला तरी…
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. काही वर्षांपूर्वी नागपूरमधील आमदार निवासात त्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले असून, बच्चू कडू यांना उद्या सेशन कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. कुंभमेळा राष्ट्रहिताचा असला तरी मोठी झाडे तोडणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. अत्यंत आवश्यक असल्यास केवळ छोटी झाडे तोडावीत, मोठी झाडे तोडू नयेत अशी विनंती त्यांनी केली. समाज आणि राष्ट्रहितासाठी कुंभमेळा असल्यास, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करणे कितपत बरोबर आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तर दुसरीकडे तामिळनाडूतील एका मंदिरात दीपस्तंभ प्रज्वलन संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर कोर्टाने परवानगी दिली आहे. मात्र, धर्मनिरपेक्ष खासदारांनी या निर्णयाला विरोध केला, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी ११२ खासदारांनी सह्या केल्या, ज्यात उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांचाही समावेश होता. अरविंद सावंत यांना हिंदू आणि मराठी माणसांनी निवडून दिले असताना, त्यांच्या अशा कृतीमुळे अपमान होत नाहीये का, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या खासदारांना योग्य धडा शिकवला असता, असेही त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे आता या खासदारांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
