Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
सोलापुरात मराठा आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. सोलापूर विद्यापीठासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
सोलापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने सुरू असून, मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर विद्यापीठासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी हे अनोखे आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
सोलापूर विद्यापीठासमोरील कोंडी गावाच्या हद्दीत असलेल्या पाण्याच्या टाक्यांवर मराठा समाजातील तरुण चढले. या पाण्याच्या टाक्यांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे युवक आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनामुळे सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आपली मागणी मांडली असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे. कॅमेरामन विनोद धुन्नाबाकर आणि सागर सुरवसे यांनी टीव्ही ९ मराठीसाठी हे वृत्त दिले आहे.
