माझा फोनदेखील… सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?

माझा फोनदेखील… सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?

| Updated on: Jul 18, 2026 | 1:50 PM

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. ते पेपरफुटी प्रकरणी 28 जूनपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. 20 दिवसांच्या उपोषणानंतर कोर्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. ते पेपरफुटी प्रकरणी 28 जूनपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. 20 दिवसांच्या उपोषणानंतर कोर्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपोषणस्थळी असलेल्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोनम वांगचुक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. तर रुग्णालयात दाखल केलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गीतांजली वांगचूक यांनी म्हटलं की, ‘माझ्या, कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सोनम यांना कोणतेही औषध देऊ नये. मला यात शंका वाटत आहे. जर सर्व गोष्टी नॉर्मल आहेत, तर सोनम यांच्या रुग्णालयातील कक्षाबाहेर इतका पोलीस बंदोबस्त का आहे? शासन हे सर्व आम्ही 20 तारखेचं आंदोलन मागे घ्यावे या साठी करत आहे. महत्त्वाचं म्हणजे आमचा फोन, सोनमचा फोन आमच्याकडे दिला जात नाहीये’. सध्या त्या स्वतः सफदरजंग रुग्णालयात उपस्थित आहेत. त्या वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांची उपोषणाच्या 21 व्या दिवशी तब्येत बिघडली, असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना शनिवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Published on: Jul 18, 2026 1:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us