Special Report | वकील Gunratna Sadavarte यांची ‘गांधी’गिरी चर्चेत-tv9

Special Report | वकील Gunratna Sadavarte यांची ‘गांधी’गिरी चर्चेत-tv9

| Updated on: Apr 26, 2022 | 9:51 PM

मागच्या 18 दिवसांपासून सदावर्तेंनी जेवण केलेलं नाही. पोलीस सदावर्तेंनी रोज जेवणाचा आग्रह धरतायत. मात्र त्याला नकार देत सदावर्तेंनी फक्त ज्यूस पिऊन कोठडीतले दिवस काढलेयत.

आझाद मैदान असो की मग जेल, सदावर्तेंचा घोषणा आजपर्यंत थांबलेल्या नाहीत. मात्र या दोन्ही दृष्यांमध्ये एक फरक आहे. तो म्हणजे कोठडीत रवानगी झाल्यापासून जेवण सोडल्यामुळे सदावर्तेंचं वजन घटलंय. मागच्या 18 दिवसांपासून सदावर्तेंनी जेवण केलेलं नाही. पोलीस सदावर्तेंनी रोज जेवणाचा आग्रह धरतायत. मात्र त्याला नकार देत सदावर्तेंनी फक्त ज्यूस पिऊन कोठडीतले दिवस काढलेयत. 9 एप्रिलला सदावर्तेंना परळच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. आधी गिरगाव, नंतर मुंबईतील ऑर्थर रोड, नंतर साताऱ्यात दाखल गुन्ह्यामुळे सातारा, तिथली कोठडी संपल्यानंतर पुन्हा मुंबई, त्यानंतर कोल्हापुरात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे पुन्हा मुंबईहून कोल्हापूर आणि आता कोल्हापूरची कोठडी संपल्यामुळे सदावर्ते परत कोल्हापूरहून मुंबईला परतले आहेत. आज पुन्हा मुंबईहून पुण्यात दाखल गुन्ह्यामुळे त्यांची पुण्यात रवानगी होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे, तूर्तास सदावर्तेमागच्या फेऱ्याला ब्रेक लागलाय. पण या दरम्यानच्या जवळपास १५ ते १८ दिवस सदावर्तेंनी फक्त ज्यूस पिल्याची माहिती आहे.

अटक झाल्यानंतर माझा खून करण्याचा डाव असल्याचा दावा सदावर्तेंनी केला होता…
मात्र आज कोर्टानं दिलासा दिल्यानंतर चौथा स्तंभ माझ्या पाठिशी असल्यामुळेच माझा खून होऊ शकत नसल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय. मराठा आरक्षणविरोधी भूमिकेनं सदावर्ते पहिल्यांदा चर्चेत आले. त्यानंतर वादग्रस्त विधानांनी त्यांचं नाव गाजलं. आझाद मैदानात सदावर्तेंच्या घोषणा लोकप्रिय झाल्या. एसटी आंदोलनात त्यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्यांच्या हेडलाईन झाल्या. संपाची केस लढताना त्यांची वकिली चर्चेत राहिली. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर सदावर्तेंच्या चिथावणीची चर्चा झाली. आणि आता तुरुंगात असताना सदावर्तेंची गांधीगिरी चर्चेत आहे.