Special Report | बाबासाहेब पुरंदरेंच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात राज ठाकरेंची फटकेबाजी!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला चिरतरुण आवाजाच्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला चिरतरुण आवाजाच्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशा अनोख्या शैलीत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि एकच हशा पिकला.
“सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो. आता मला त्यांच्या सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात, इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणार इतिहास बाबासाहेब सांगतात” अशा शब्दात राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचे कंगोरे उलगडले.
