Special Report | महाराष्ट्राला नवे मंत्री, पालकमंत्री कधी मिळणार?-tv9

Special Report | महाराष्ट्राला नवे मंत्री, पालकमंत्री कधी मिळणार?-tv9

| Updated on: Jul 27, 2022 | 9:34 PM

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारीच राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोश्यारीही दिल्लीत असल्यानं मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होणार का? अशी चर्चा आहे.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असं सांगून आता 27 दिवस झालेत..पण महाराष्ट्राला काही नवे मंत्री आणि जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अंतिम टप्प्यात आलाय. कारण स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं मंत्रिपदाचं वाटप आणि यादी अंतिम होण्याची शक्यता आहे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळं भुवया आणखी वाढल्यात. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारीच राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोश्यारीही दिल्लीत असल्यानं मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होणार का? अशी चर्चा आहे.

Published on: Jul 27, 2022 09:34 PM