Sunetra Pawar | बारामती पोटनिवडणूक: आजची निवडणूक दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी, मेळाव्यात सुनेत्रा पवारांचे भावनिक वक्तव्य
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खास मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींसह भावनिक वक्तव्य केले. त्यांनी सांगितले, “दोन महिन्यांपूर्वी आपण आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खास मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींसह भावनिक वक्तव्य केले. त्यांनी सांगितले, “दोन महिन्यांपूर्वी आपण आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. दादाचं जाणं ही फक्त माझी किंवा कुटुंबाची हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशासाठी मोठी हानी ठरली.” सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांच्या सेवेला महत्त्व देत म्हटले, “बारामती दादांसाठी आईसारखी होती. बारामतीकरांची सेवा करणे म्हणजे दादांच्या विश्वासाचा आधार होता. बारामती हा दादांचा श्वास होता, त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीत राहिला.” त्यांनी सांगितले की बारामतीतील प्रत्येक झाड, पान, फुल, रस्ते, शाळा, नदी आणि इमारतींमध्ये अजित पवारांचा स्पर्श आहे. सदस्यतेसाठी अर्ज दाखल करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “तुमचं प्रेम, पाठिंबा आणि साथ हीच माझी शक्ती आहे. गेल्या 35-36 वर्षांत आदरणीय अजितदादांना बारामतीकरांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. आजची निवडणूक दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे.” बारामती पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरत असून, सर्व पक्ष आणि मतदार या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत.
