Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते…
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबत मोठा दावा करत आगामी राजकीय समीकरणांबाबत वक्तव्य केले होते. या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असा दावा केला होता. तसेच, सुप्रिया सुळे राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सांभाळतील, तर राज्यातील नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल. केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, रवी राणा यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आल्यानंतर सुनील तटकरे यांनी भाष्य करण्याचे टाळले. माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले, “रवी राणा हे फार मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने त्यांच्यावर वक्तव्य करणं योग्य नाही. ते खूप मोठे नेते आहेत.” एवढेच बोलून त्यांनी या विषयावर अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, रवी राणा यांच्या दाव्यांवर आणि सुनील तटकरे यांच्या सूचक प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून, आगामी काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.