राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर

राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर

| Updated on: Aug 10, 2026 | 12:35 PM

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल होत आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी जवळपास अर्धा तास बैठक होत असून, यामध्ये राज्यातील विविध प्रश्नांसह खासदारांच्या मतदारसंघातील समस्यांवर चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झाले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी जवळपास अर्धा तास बैठक झाली असून, यामध्ये राज्यातील विविध प्रश्नांसह खासदारांच्या मतदारसंघातील समस्यांवर चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार उपस्थित आहेत. खासदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील पूरस्थिती, पावसाची परिस्थिती, पिकांच्या किंमती आणि विकासाशी संबंधित मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले गेले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत सुरू असलेली बैठक राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत झालेली भेट राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Published on: Aug 10, 2026 12:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us