पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. धरण सध्या 94 टक्के भरले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने धरणातून 30 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज सकाळी 7 वाजल्यापासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी, ओढे आणि पूल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः मनोर तालुक्यातील मासवन परिसरातील सूर्या नदीच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी नदीकाठच्या शेतीमध्येही पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून होणाऱ्या विसर्गात बदल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.