Sushil Kedia : …तोपर्यंत मराठी नाहीच, क्या करना है बोल; राज ठाकरेंना जाहीरपणे कोणी डिवचलं?

Sushil Kedia : …तोपर्यंत मराठी नाहीच, क्या करना है बोल; राज ठाकरेंना जाहीरपणे कोणी डिवचलं?

Harshada Shinkar | Updated on: Jul 04, 2025 | 4:00 PM

हिंदी विरोधातील जीआर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होणार असल्याने वातावरण आणखी तापले आहे. अशातच आता एका प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचलं आहे.

राज्यात सध्या हिंदी-मराठी भाषा वादावरून वांदग सुरू आहे. अशातच एका प्रसिद्ध व्यावसायिकाने या भाषा वादात उडी घेतली आहे. इतकंच नाहीतर त्याने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरपणे सांगितले की, मी मराठी भाषा शिकणार नाहीत. सुशील केडिया यांनी ट्विट करत थेट राज ठाकरे यांनाच टॅग करत चॅलेंज केल्याचे पाहायला मिळत आहे.

केडिया यांनी लिहिले की, ‘मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या गैर वर्तनामुळे मी असा निर्धार केला की, जोपर्यंत तुमच्यासारखी लोकं मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोल?’ केडिया यांनी ही पोस्ट मीरा भाईंदर मधील एका दुकान मालकावर कथित हल्ला करण्याच्या व्हिडिओनंतर केली आहे. ज्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने त्याच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

Published on: Jul 04, 2025 3:59 PM
Follow Us