एकच खळबळ! सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच केली थेट या पदावर नियुक्ती

एकच खळबळ! सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच केली थेट या पदावर नियुक्ती

| Updated on: May 12, 2026 | 12:09 PM

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. अखेर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा कमळ खुलंलच. यानंतर पश्चिम बंगालमधून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. अखेर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा कमळ खुलंलच. यानंतर पश्चिम बंगालमधून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा कार्यकाळ सुरु होताच अनेक राजकीय घडामोडींना वेग आलं आहे. या घटनेमुळे देशभरातली राजकारण तापण्याची शक्यता आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिव पदी अशा व्यक्तीची निवड केली ज्यांची कोणी कल्पनाही केली नसेल.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिव या पदावर मुख्य निवडणूक अधिकारीची निवड केली आहे. या निर्णयानंतर टीएमसी नेत्यांनी सरकारवर जोरदार आहे. एकीकडे मुख्य निवडणूक आयुक्त मनोज कुमार अग्रवाल यांना मुख्य सचिव म्हणून पद मिळालं आहेत तर दुसरीकडे त्यांच्या या नियुक्तीनं रजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षानं भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. आता पुढे पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय काय घडेल या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 12, 2026 12:09 PM
Follow Us