मोठी बातमी! निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट… एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट… एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी; नेमकं काय घडलं?

| Updated on: May 08, 2026 | 3:42 PM

टीसीएस कंपनीशी संबंधित प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खान हिला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान, तिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिला होता, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

टीसीएस कंपनीशी संबंधित प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खान हिला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान, तिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिला होता, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. तसेच, एमआयएमच्या नगरसेवकाला पोलीस सहआरोपी करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. निदा खान ही नारेगावातील कैसर कॉलनी येथील फ्लॅटमध्ये तिची आई, वडील, भाऊ आणि काकीसोबत राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ती अवघ्या चार दिवसांपूर्वीच या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आली होती. दोन दिवसांपूर्वीच ती या परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र कोणतीही जोखीम टाळण्यासाठी पोलिसांनी प्रथम परिसराची आणि संबंधित फ्लॅटची गुप्त रेकी केली. त्यानंतर योग्य नियोजन करत पोलिसांनी सापळा रचून निदा खान हिला अटक केली.
या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली असून, धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले आहे. पोलिसांकडून आता निदा खानची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Published on: May 08, 2026 02:58 PM
Follow Us