TET Exam Rada : मंगळसूत्र काढा, मगच परीक्षेला आत सोडणार! संभाजीनगरात धक्कादायक प्रकार

TET Exam Rada : मंगळसूत्र काढा, मगच परीक्षेला आत सोडणार! संभाजीनगरात धक्कादायक प्रकार

| Updated on: Feb 09, 2026 | 8:36 AM

केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET) परीक्षेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांना मंगळसूत्र आणि इतर दागिने काढण्यास सांगण्यात आले. सुरक्षेच्या नावाखाली घातलेल्या या अलिखित नियमामुळे परीक्षार्थी संतप्त झाल्या. हॉल तिकीटवर सूचना नसताना, विवाहितेची ओळख असलेल्या मंगळसूत्रासह दागिने काढण्यास भाग पाडल्याने अनेक महिलांची गैरसोय झाली.

छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET) परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थींना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढण्यास सांगण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा नियम लागू करण्यात आल्याचे परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अनेक महिलांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला.

परीक्षार्थी महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या हॉल तिकीटवर अशा कोणत्याही नियमाचा उल्लेख नव्हता. मंगळसूत्र ही विवाहित महिलेची ओळख मानली जाते आणि ते काढण्यास भाग पाडणे हा अन्याय असल्याचे त्यांचे म्हणणे होते. ज्या महिलांसोबत त्यांचे नातेवाईक होते, त्यांनी दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले. परंतु, एकट्या आलेल्या महिलांची यामुळे मोठी गैरसोय झाली. या प्रकाराची सरकारने त्वरित दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.

Published on: Feb 09, 2026 08:36 AM