ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

| Updated on: Jul 19, 2026 | 9:00 PM

ठाकरे गट सध्या पक्षाच्या पुनर्बांधणीत लागेल आहे. आशात ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गट सध्या पक्षाच्या पुनर्बांधणीत लागेल आहे. आशात ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसला आहे.
जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुखांनी आपल्या त्यांच्या कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा जळगावच्या राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली ताकद वाढवली आहे.

ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुखांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे संघटन काही प्रमाणात कमकुवत झाले असून, भाजपची स्थानिक पातळीवरील ताकद व जनसंपर्क अधिक बळकट झाला आहे.संबंधित महिला नेत्यासोबत त्यांच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर भाजपचे पारडे जड झाले आहे.

Published on: Jul 19, 2026 9:00 PM
Follow Us