Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?

Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?

| Updated on: Sep 30, 2026 | 7:58 AM

ठाण्यात ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णणेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पूर्णणेकर कुटुंबियांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. जुन्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा कुटुंबियांनी केला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

ठाण्यात ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णणेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित हल्लेखोरांपैकी दोघांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. पूर्णणेकर यांच्या कार्यालयात चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पूर्णणेकर यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जुन्या राजकीय वादातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. “इलेक्शननंतर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे मला मारण्याचा प्रयत्न करतील,” असे प्रदीप पूर्णणेकर यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितले होते, असे त्यांच्या मुलाने म्हटले आहे. तसेच, कॉल रेकॉर्डिंगमध्ये “बाळूला जीव मारून टाकणार” अशी धमकी मिळाल्याचेही कुटुंबियांनी सांगितले.

या घटनेच्या तपासासाठी क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांच्या आठ ते नऊ टीम कार्यरत आहेत. पूर्णणेकर कुटुंबियांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Published on: Sep 30, 2026 7:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us