खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेटचाही आरोप

खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेटचाही आरोप

| Updated on: Mar 28, 2026 | 12:12 PM

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याची कोठडी उद्या संपणार असल्याने उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.भोंदूबाबावर आणखीन दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

राज्यातील महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक असलेल्या नाशिकच्या भोंदू बाबाची कोठी उद्या २९ मार्च रोजी संपत आहे. उद्या त्याला न्यायालयात सादर केले जाणार आहे. आजचा दहावा चौकशीचा दिवस महत्वाचा आहे. काल मध्यरात्री खरातवर आणखीन दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे खरातवर दाखल एकूण गुन्ह्यांची संख्या १० वर पोहचली आहे.या दोन गुन्ह्याचा तपास करायचा आहे. आणखी काही महिला तक्रारदार पुढे येताहेत त्यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे मोठे काम एसआयटीकडे असणार आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे भोंदूबाबाचे हवाला रॅकेट चालत होते. त्याचा काही सुगावा लागतोय का ? त्याचे नेटवर्क शोधून काढायचे आहे. त्याचे काही आंतरराष्ट्रीय हवाला संबंध आहेत का याचा तपास करायचा असल्याने आजचा दिवस तपासाचा महत्वाचा आहे.उद्या खरातबाबाला कोर्टात हजर केले जाणार असून उद्या कोर्टात पोलिस काय सांगतात याकडे लक्ष लागले आहे.

 

Published on: Mar 28, 2026 12:11 PM
Follow Us