ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर मनोमिलन? रायगडमध्ये ‘पोस्टर’वर ठाकरे-शिंदेंची युती, ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा
रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 'पोस्टर'वर युती झाल्याचे दिसतंय. रायगडमध्ये लावण्यात आलेल्या एका पोस्टरवर ठाकरे यांच्या शिवसेनेतील अरविंद सावंत आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील भरत गोगावले या नेत्यांचे एकत्र फोटो दिसताय.
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ‘पोस्टर’वर युती झाल्याचे दिसतंय. रायगडमध्ये लावण्यात आलेल्या एका पोस्टरवर ठाकरे यांच्या शिवसेनेतील अरविंद सावंत आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील भरत गोगावले या नेत्यांचे एकत्र फोटो दिसताय. त्यामुळे रायगडमध्ये सध्या भरत गोगावले आणि अरविंद सावंत या नेत्यांची चर्चा होताना दिसतेय. सोशल मीडियावर रायगड जिल्ह्यातील उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या युतीचे बॅनर चांगलंच व्हायरल होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचें आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं खरंच मनोमिलन झालं का? असा सवाल उपस्थित होत असून रायगडमध्ये ‘पोस्टर’वर झालेल्या ठाकरे-शिंदेंची युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
