सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर दिलेल्या उत्तराने खळबळ

सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर दिलेल्या उत्तराने खळबळ

| Updated on: Jun 17, 2026 | 1:41 PM

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात नॉट रिचेबल असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. ‘मी पुण्यातच आहे. दिल्लीला गेलेलो नाही’ असं त्यांनी सांगितलं.

मी पुण्यातच आहे. दिल्लीला गेलेलो नाही’ असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत असही त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? यावर ओमराजे निंबाळकर यांनी थेट उत्तर देणं टाळलं. वारंवार विचारता निंबाळकरांनी बोलणं टाळलं अखेर फोन कट केला.

आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाईल, राजाभाऊ वाजे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यात संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, “मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना नाहीच. जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही” दरम्यान कोणाच्या संपर्कात नसलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांच्याशी टीव्ही 9 मराठीचा संपर्क झाला आहे.

Published on: Jun 17, 2026 1:41 PM
Follow Us