‘बाजारबुणगे, हिंमत असेल तर येऊन बघ…’, उद्धव ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?

‘बाजारबुणगे, हिंमत असेल तर येऊन बघ…’, उद्धव ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?

Harshada Shinkar | Updated on: Sep 25, 2024 | 3:18 PM

नागपूर येथून महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन गेले आणि आम्हाला संपविण्याची भाषा करुन गेले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे काल नागपूर येथे येऊन आम्हाला खतम करण्याची भाषा करुन गेले आहेत, मी त्यांचे भाषण काही ऐकलेले नाही. परंतू येथे येऊन उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवार यांना खतम करा असे बाजारबुणगे म्हणाले आहेत. त्यांना आपला महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे. मात्र त्यांना याची कल्पना नाही की हा महाराष्ट्र वीरांचा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे… तुम्ही या तर खरे कोण कोणाला संपवितो ते पाहतो. आम्हाला संपविण्याची भाषा करतात त्यांना योग्य धडा शिकवू असे म्हणत अप्रत्यक्षपणे अमित शाह यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशाबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. वैजापूरातील निष्टेचा पुन्हा विजय झाला आहे. वाणी साहेबांची निष्टा घेऊन शिवसेनेचा भगवा पुन्हा भडकावा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. बघा काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

Published on: Sep 25, 2024 3:18 PM
Follow Us