Tv9 Marathi Special Report | विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह
महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी द्यावी, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसकडून ठाकरेंना पाठिंबा असल्याचं सूचित केलं आहे. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका मांडत, “ठाकरे निवडणूक लढत नसतील तर ही जागा काँग्रेसला मिळावी,” अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी द्यावी, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसकडून ठाकरेंना पाठिंबा असल्याचं सूचित केलं आहे. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका मांडत, “ठाकरे निवडणूक लढत नसतील तर ही जागा काँग्रेसला मिळावी,” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी सावध भूमिका घेत, “पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल,” असं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे भाजपकडून टीका करत, काँग्रेसने विधानपरिषदेच्या बदल्यात आगामी राज्यसभेची जागा मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही ठाकरेंनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह व्यक्त करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत, “उद्धव ठाकरे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा,” अशी विनंती केली आहे.या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा रंगल्या असून, उद्धव ठाकरे अखेर काय निर्णय घेतात, याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.
