भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून… उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून… उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

| Updated on: Jun 28, 2026 | 12:14 PM

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज संजय जाधव यांच्या मतदारसंघात आहेत. त्यांच्या परभणी दौऱ्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी बंडखोर खासदारंवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज संजय जाधव यांच्या मतदारसंघात आहेत. त्यांच्या परभणी दौऱ्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी बंडखोर खासदारंवर जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबन खासदार संजय राऊत, अरविंद सावंत तसेच इतर नेतेही उपस्थि होते.

या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मला विशेष म्हणजे येथिल जनतेची माफी मागायची आहे. त्यांच्यासोबत जो विश्वासघात झाला त्याची मी माफी मगाणार असं त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, हे ऑपरेशन वगैरे जे सुरु आहे ते ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेश देवेंद्र आहे… देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर कोणाचं तरी पंतप्रधान पद जाईल म्हणून त्यांना संपण्याचा हा कट आहे असा थेट टोला त्यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. हा टोला गृहमंत्री अमित शहा यांना असावा अशा चर्चा आहेत.

Published on: Jun 28, 2026 11:47 AM
Follow Us