ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 14, 2026 | 4:27 PM

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संसदीय गटाची महत्त्वाची बैठक आज 14 जून रोजी पार पडली. या बैठकीला पक्षाचे काही खासदार अनुपस्थित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. बैठक संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत सविस्तर माहिती दिली

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संसदीय गटाची महत्त्वाची बैठक आज 14 जून रोजी पार पडली. या बैठकीला पक्षाचे काही खासदार अनुपस्थित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. बैठक संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ‘ऑपरेशन टायगर’वरही त्यांनी भाष्य केले. मात्र चर्चा काही थांबेना… अशात ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आष्टीकर ही पत्रकार परिषद घेणार आहेत, हे त्यांनी आधीच कळवले होते. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिथेच लागल्या होत्या. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, ‘ठाकरेंची साथ सोडून कुठेच चालले नाही आहोत, महत्त्वाच्या काही कामांमुळे उपस्थित राहणे शक्य नव्हते.’

नागेश आष्टीकरांच्या पत्रकार परिषदेमुळे समर्थकांमधील संभ्रम दूर झाला. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि ते बैठकीत व्हर्च्युअली उपस्थित असल्याचे दाखवले.

Published on: Jun 14, 2026 4:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us