‘संजय राऊत यांनी आधी स्वतः च्या कपड्यांकडं बघावं’, राऊतांच्या ‘त्या’ टीकवेर कुणी घेतला खरपूस समाचार?

‘संजय राऊत यांनी आधी स्वतः च्या कपड्यांकडं बघावं’, राऊतांच्या ‘त्या’ टीकवेर कुणी घेतला खरपूस समाचार?

Harshada Shinkar | Updated on: Aug 28, 2023 | 6:12 PM

VIDEO | संजय राऊत यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल, संजय राऊत यांनी सरकारवर केलेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला समाचार; म्हणाले, ''ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी राज्य सरकारच्या...'

जळगाव, २८ ऑगस्ट २०२३ | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहालया मिळाले. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, माझ्या नांदी लागू नका, नाही तर तुमचे सर्वांचे कपडे फाडेल. संजय राऊत यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील आक्रमक होत म्हणाले, ‘ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी राज्य सरकारच्या कपड्यांकडे बघू नये. पहिले स्वतः आपल्या कपड्याकडे बघावं’, असे म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Published on: Aug 28, 2023 6:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us