Vidhanparishad | …तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना वेग
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवडणूक न लढण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती समोर आल्यानंतर मात्र महाविकास आघाडीतील नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून जर उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आले, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकारणात मोठे निर्णय होण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असतानाही कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे
Published on: Apr 27, 2026 3:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us