मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?; शिंदे गटाकडून दहावा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू

मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?; शिंदे गटाकडून दहावा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू

| Updated on: Apr 27, 2026 | 1:02 PM

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ठाकरे यांना निवडणूक लढवण्याबाबत मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. मविआकडून उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यानुसार भाजपचे 5, शिवसेना (शिंदे गट) 2, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार सहज विजयी होऊ शकतो, असे चित्र आहे. मात्र, उद्धव ठाकरे निवडणुकीपासून दूर राहिल्यास निवडणूक होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून दहावा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Published on: Apr 27, 2026 01:02 PM
Follow Us