Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन

Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन

| Updated on: Jun 29, 2026 | 10:29 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू ठेवला असून, आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज शिर्डी येथे भेट देणार असून, फुटीर खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता शिर्डी येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षातील एकनिष्ठ शिवसैनिकांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय रणनीतीवर मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

अलीकडेच ठाकरे गटातील काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्यावर आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेतेही या दौऱ्यात सहभागी झाले असून, विविध ठिकाणी एकनिष्ठ शिवसैनिकांचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या दौऱ्याला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शिर्डीतील आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडतात आणि फुटीर खासदारांबाबत काय भाष्य करतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 29, 2026 10:29 AM
Follow Us