Gadchiroli | गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान

Gadchiroli | गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान

| Updated on: Mar 19, 2026 | 7:17 PM

गडचिरोली जिल्ह्यात भर उन्हाळ्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांत रात्री तसेच पहाटेच्या सुमारास दोन ते तीन वेळा पाऊस पडल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात भर उन्हाळ्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांत रात्री तसेच पहाटेच्या सुमारास दोन ते तीन वेळा पाऊस पडल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी मिरचीचे चांगले उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र अवकाळी पावसामुळे हा आनंद मावळला आहे. एका शेतकऱ्याच्या सुमारे 3 एकर शेतीत 70 ते 80 क्विंटल मिरचीचे उत्पादन झाले होते, त्यापैकी जवळपास ७ क्विंटल मिरची खराब झाली आहे. यामुळे त्या शेतकऱ्याला अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान, काही भागांत भात, मका तसेच आंबा पिकांचेही नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत असून, प्रशासनाकडून पंचनामा आणि मदतीची मागणी केली जात आहे.

Published on: Mar 19, 2026 07:17 PM
Follow Us